Use of ‘are’

'आहेत' चा वापर

वर्तमान (अस्तित्त्वात असलेल्या) स्थितीच्या वाक्यात 'आहेत' चा वापर

‘आहेत’ (आर) ‘असणे’ (to be) चा एक प्रकार आहे.

चला ‘आर’ कसा वापरायचा ते पाहू.

आपण are आर (आहेत) चा वापर –

 •  स्थिती
 • व्यवसाय
 • शारीरिक परिस्थिती
 • सतत ची क्रिया

सांगण्यासाठी करू शकतो.

वाक्याची रचना

'आहेत' चा वापर साध्या वाक्यांत-

 • 'आम्ही' (प्रथम व्यक्ती अनेकवचनी संख्या),
 • 'तू /तूम्ही' (द्वितीय व्यक्ती एकवचनी संख्या तसेच अनेकवचनी संख्या)
 • 'ते' (तो, ती आणि ते चे अनेकवचन),
 • हे, ते किंवा कोणतीही अनेकवचनी नाम असलेला कर्ता

या सह केला जातो.

या वाक्याची रचना अशी आहे;

 • Subject(we/you/you/they/these/those) + are + remaining words
 • कर्ता (आम्ही /तू /तूम्ही/ ते/ या /त्या कोणतेही अनेकवचनी नाम ) + are आहेत + उर्वरित शब्द

सध्याच्या स्थितीबद्दल सांगण्यासाठी are 'आहेत' चा वापर

येथे काही उदाहरणे आहेत.

एक नजर टाका-

 1. We are students.
  आम्ही विद्यार्थी आहोत.
 2. You are a student.
  तू विद्यार्थी आहेस.
 3. You are the students.
  तुम्ही विद्यार्थी आहात.
 4. They are students.
  ते विद्यार्थी आहेत.
 5. His sisters are so sad.
  Error occurred when trying to fetch the file using wp_remote_get(). cURL error 35: Recv failure: Connection reset by peer
  त्याच्या बहिणी खूप दुःखी आहेत.
 6. The boys are pleased.
  मुले खूश आहेत.
 7. They are creative.
  ते सर्जनशील आहेत.
 8. You are tired.
  तु थकला आहेस./तुम्ही थकले आहात
 9. We are tired.
  आम्ही थकलो आहोत.
 10. They are happy.
  ते आनंदी आहेत.
 11. Her siblings are happy.
  तिची भावंडे आनंदी आहेत.
 12. They are surprised.
  ते आश्चर्यचकित झालेले आहेत.
 13. We are a family.
  आम्ही/आपण कुटुंब आहोत.
 14. We are so sorry.
  आम्ही अत्यंत दिलगीर आहोत.
 15. They are liars.
  ते खोटारडे आहेत.
 16. The girls are beautiful.
  मुली सुंदर आहेत.
 17. We are thirsty.
  आम्ही तहानलेले आहोत.
 18. Students are well dressed.
  विद्यार्थ्यांनी चांगले कपडे घातले आहेत.
 19. We are hungry.
  आम्ही भुकेले आहोत.
 20. You are ten years old.
  तू दहा वर्षांचा आहेस
 21. They are on time.
  ते वेळेवर आहेत.
 22. You are wrong.
  तुझे चूक आहे.
 23. They are joyful.
  ते आनंदित आहेत.
 24. They are superstitious.
  .ते अंधश्रद्धाळू आहेत.
 25. We are innocent.
  आम्ही निर्दोष आहोत.
 26. You are smart.
  तू चलाख आहेस. /तुम्ही चलाख आहात.
 27. They are rude.
  ते उद्धट आहेत.
 28. They are frightened.
  ते घाबरले आहेत.
 29. We are polite.
  आम्ही सभ्य आहोत.
 30. All servants are loyal.
  सर्व सेवक निष्ठावान आहेत.

BACK    NEXT