वअ: व्यवसायाबद्दल नकारात्मक उत्तरे
या धड्यात आपण 'वअ' वापरून व्यवसायाबद्दल नकारात्मक वाक्यात उत्तर कसे द्यावे हे पाहू.
नकारात्मक उत्तराची रचना
ही नकारात्मक उत्तरे आहेत. नकारात्मक उत्तराची रचना अशी आहे;
- No, + Subject (we/ you/they/ other plural noun)+ were not + remaining words.
- नाही, + कर्ता (आम्ही /तू, तूम्ही/ ते / अन्य अनेकवचनी नाम) + were not (नव्हतो /नव्हता/ नव्हते) + उर्वरित शब्द
किंवा थोडक्यात उत्तर देण्यासाठी आपण फक्त-
- No, + subject + weren’t.
- नाही + कर्ता + नव्हतो /नव्हता/ नव्हते
असे म्हणू शकतो.
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका–
- No, we were not hawkers. नाही, आम्ही हातगाडीवरून माल विकणारे फेरीवाले नव्हतो. (No, we weren’t.)
- No, you were not MLAs. नाही, तुम्ही आमदार नव्हता. (No, you weren’t.)
- No, you were not a blacksmith. नाही, तु/ तुम्ही लोहार नव्हता. (No, you weren’t.)
- No, my two brothers were not pilots. नाही, माझे दोन भाऊ वैमानिक नव्हते. (No, they weren’t.)
- No, they were not shopkeepers. नाही, ते दुकानदार नव्हते. (No, they weren’t.)
- No, her sisters were not designers. नाही, तिच्या बहिणी योजक (डिझायनर) नव्हत्या.(No, they weren’t.)
- No, his parents were not collectors. नाही, त्याचे पालक संग्राहक नव्हते. (No, they weren’t.)
- No, her three neighbors were not watchmen. नाही, तिचे तीन शेजारी पहारेकरी नव्हते. (No, they weren’t.)
- No, Sahil and his friend were not taxi drivers. नाही, साहिल आणि त्याचे मित्र टॅक्सी चालक नव्हते. (No, they weren’t.)
- No, they were not fiction writers.नाही, ते कल्पित कथा लेखक नव्हते. (No, they weren’t.)
- No, Sameer and his colleagues were not architects.नाही, समीर आणि त्याचे सहकारी वास्तुविशारद नव्हते. (No, they weren’t.)
- No, they were not skilled potters. नाही, ते कुशल कुंभार नव्हते. (No, they weren’t.)
- No, you were not a bank manager. नाही, तु / तुम्ही एक बँक व्यवस्थापक नव्हता. (No, you weren’t.)
- No, you were not news reporters. नाही, तुम्ही बातमी पत्रकार नव्हता. (No, you weren’t.)
- No, Tarak and his uncle were not comic poets. नाही, तारक आणि त्यांचे काका हास्यकवी नव्हते. (No, they weren’t.)
- No, Lara’s friends were not clerks in school. नाही, लाराचे मित्र शाळेत लिपिक नव्हते.(No, they weren’t.)
- No, they were not Foreign Ministers. नाही, ते परराष्ट्र मंत्री नव्हते. (No, they weren’t.)
- No, Sachin’s two brothers were not cricket players. नाही, सचिनचे दोन भाऊ क्रिकेट खेळाडू नव्हते. (No, they weren’t.)
- No, we were not doctors at government hospitals. नाही, आम्ही सरकारी रुग्णालयात डॉक्टर नव्हतो. (No, we weren’t.)
- No, my husband and brother were not professors at Bhavans College.नाही, माझे पती आणि भाऊ भवन्स महाविद्यालयात प्राध्यापक नव्हते. (No, we weren’t.)
- No, my sisters were not chemical engineers. नाही, माझ्या बहिणी रासायनिक (अभियंता)अभियंत्या नव्हत्या. (No, they weren’t.)
- No, they were not ticket checkers in the railway department. नाही, ते रेल्वे विभागात तिकीट तपासक नव्हते. (No, they weren’t.)
- No, she and her son were not advocates at the Supreme Court.नाही, तिचा मुलगा आणि ती दोघे सर्वोच्च न्यायालयात वकील नव्हते. (No, they weren’t.)
- No, his two uncles were not professional photographers. नाही, त्याचे दोन काका व्यावसायिक छायाचित्रकार नव्हते. (No, they weren’t.)
- No, they were not motormen on the Mumbai local train.नाही, ते मुंबई लोकल ट्रेनमध्ये आगगाडी चालक नव्हते. (No, they weren’t.)
- No, both sisters were not nurses in medical college.नाही, दोन्ही बहिणी वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका नव्हत्या. (No, they weren’t.)
- No, you were not officers in the education department.नाही, तुम्ही शिक्षण विभागात अधिकारी नव्हता. (No, you weren’t.)
- No, Smita and her spouse were not teachers in Aurangabad.नाही, स्मिता आणि तिचे पती औरंगाबादमध्ये शिक्षक नव्हते. (No, they weren’t.)
- No, we were not academic book publishers. नाही, आम्ही शैक्षणिक पुस्तक प्रकाशक नव्हतो. (No, we weren’t.)
- No, they were not booksellers in Pune. नाही, ते पुण्यात पुस्तक विक्रेते नव्हते. (No, they weren’t.)