About Games

खेळांबद्दल

  1. It was offside.
    तो ऑफसाइड/ खेळाडू ज्या जागेत खेळू शकत नाही त्या जागेचा होता.
  2. It was a long-range free-kick.
    ही लांब पल्ल्याची फ्री-किक होती.
  3. He is an athlete.
    तो शारीरिक कसरतपटू आहे.
  4. It’s a perfect hockey stick for a player.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    एखाद्या खेळाडूसाठी ही एक परिपूर्ण हॉकी स्टिक आहे.
  5. My sister plays chess.
    माझी बहीण बुद्धिबळ खेळते.
  6. Sam is good at football.
    सॅम फुटबॉलमध्ये चांगला आहे.
  7. Football is his favorite game.
    फुटबॉल हा त्याचा आवडता खेळ आहे.
  8. Raveena likes skating.
    रवीनाला स्केटिंग आवडते.
  9. PT Usha has set a record in the running.
    पी टी उषाने धावण्याचा विक्रम केला आहे.
  10. Which game do you like?
    आपल्याला कोणता खेळ आवडतो?
  11. I like table tennis.
    मला टेबल टेनिस आवडतो.
  12. I was a table tennis champion at my college.
    मी माझ्या कॉलेजमध्ये टेबल टेनिस चॅम्पियन होतो.
  13. Do you play cricket?
    आपण क्रिकेट खेळता का?
  14. Yes, I do.
    होय, मी खेळतो.
  15. Let us play cricket.
    चला क्रिकेट खेळूया.
  16. This year World cup tournament took place in India.
    यावर्षी विश्वचषक स्पर्धा भारतात झाली.
  17. Ten teams contested the tournament.
    दहा संघ स्पर्धेत उतरले.
  18. Which team has won?
    कोणता संघ जिंकला?
  19. India won by three wickets.
    भारताने तीन गडी राखून विजय मिळवला.
  20. Dhoni is a captain of the Indian Cricket Team.
    धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे.
  21. Jasprit Bumrah is a fast bowler.
    जसप्रीत बुमराह हा वेगवान गोलंदाज आहे.
  22. The finals involved two teams.
    अंतिम सामन्यात दोन संघांचा समावेश होता.
  23. Which is another one?
    दुसरा कोणता आहे?
  24. India and England qualified for the final.
    भारत आणि इंग्लंड अंतिम फेरीसाठी पात्र झाले.
  25. I play regularly for the team.
    मी संघासाठी नियमितपणे खेळतो.
  26. My team is participating in the National Football Tournament.
    माझी टीम राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भाग घेत आहे.
  27. Last month we had applied to enter the qualifying process.
    मागील महिन्यात आम्ही पात्रता प्रक्रियेमध्ये प्रवेश करण्यासाठी अर्ज केला होता.
  28. Did your team qualify?
    तुमची टीम पात्र झाली का?
  29. Yes, we all played dedicatedly.
    होय, आम्ही सर्व समर्पितपणे खेळलो.
  30. We are making our first appearance at this tournament.
    आम्ही या स्पर्धेतुन प्रथम पदार्पण करत आहोत.

                          Back          Next